आयतेच टेस्टिंग
आयतेच टेस्टिंग
आॉफिसचे काम घरात बसून करायचे
हो घरात बसून करायचे
काय तुझ्या बापाच ऑफिस आहे का
सवाल असायचा सर्वांचा!
बदलला दृष्टीकोन ह्या करोना महामारीने
कस करणार आता हे ऑफिसचे काम घरनं?
करणार्याना उत्तर मिळाले
बघा १८-२० महिने झाले आयतेच टेस्टिंग झाले!!
झाला काही वेळा आरडा ओरडा
पण ऑफिसला जायचे म्हटले की
चढतात कपाळावर आठ्या!
जायचा यायचा वेळ वाचतो
वाचतो पैसा थोडा!
ऊठ सुठ चहा कॉफी पी
सिगरेटच्या झुरक्याने प्रदुषणात भर टाका!
आता झाली घरीच सवय
न सिगरेट चहा कॉफी कामा सोबत!
सोडू म्हणत होतो सोडू सिगरेट चहा कॉफी
पण सुटता सुटत नव्हता हा पाश!
झाले आयतेच टेस्टिंग न पीण्याचे सिगरेट चहा कॉफी!
सुट बुट, किंमती कपडे!
शो ऑफ सारा
गळून पडला फूकाचा तोरा!
आयतेच टेस्टिंग झाले
बदलला दृष्टिकोन सारा
जगण्यास काय हवे ते मला!!!
