STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

आवड...!

आवड...!

1 min
273

आवड...!


प्रत्येकाची प्रदर्शन

वेगवेगळी

इथून तिथून

सारखी सगळी..


कोणास म्हणे

गद्य आवडे

कोणास म्हणे

पद्य आवडे...


कोणी म्हणे मज

पोवाडा आवडे

कोणी म्हणे मज

लावणी आवडे...


मला वाटते

सारेच मन कवडे

आतल्या आत

वेगळ्या गाठीचे...


मुखवटेच घालून

सारे जगती

मिळवितात पण

खुले म्हणुनी जगती...


बोट दावूनी

चुका दाखविती

प्रश्न पुसता

तोंड फिरविती...


त्यास्तव आता वाटते

नको नको ते मनी घाटते

न्यूनता तर सर्वात असते

ती कधी दिसते कधी लपते...


त्या न्यूनतेचे

आता नको प्रदर्शन

चला सारे मिळूनी

जागवू मराठीचे जागर....


भरपूर वाचू

भरपूर लिहू

एकमेकांना 

चला समजून घेऊ...


हीच जाण

हीच ओळख

आपली मराठीने वाढवू

मराठीला चला खूप जगवू....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational