आठवते ते बालपण
आठवते ते बालपण
टुमदार पावले अंगणी
खेळु बागडु लागली
विटीदांडू लगोरी लपंडाव
खेळात रमु लागली ।।१।।
बघता बघता मग
शाळेची घंटा वाजली
खेळ अर्ध्यावर मग
सोडुन अभ्यासात रमु लागली ।।२।।
अभ्यासात उसंत मिळता
बाळ गोपाळ धमाल मस्ती
पालकांनी घेतली मग
बाळांची चांगलीच धास्ती ।।३।।
दिवसा मागुन दिवस
सरत पुढे गेले वयही वाढत गेले
बालपण ते साठवणीत
आठवणीत कायम राहुन गेले ।।४।।
