STORYMIRROR

Sneha Bawankar

Children

3  

Sneha Bawankar

Children

आठवणीतील शाळा

आठवणीतील शाळा

1 min
236

*चिमुकली पाखरू मी*

*प्रांगणात उतरली,*

*परिसरात शाळेच्या*

*अनेक खेळ मी खेळली.*

*झाडांची सावली घेण्या*

*सर्वात आधी मी धावली,*

*प्रार्थना ऐकताच वाटले*

*शाळेचे गुरूच माझी माऊली.*

*चाहूल माझ्या रंगांची*

*कागदावर उतरली,*

*माझ्या रंगांचे स्वर्ग बघून*

*मीही गुरुजनांच्या मनाला भासली.*

*बुध्दी नाही रे माझ्या शिक्षणात*

*पण विचारांनी मी गोड ठरली,*

*चोर म्हटले आहे रे मला*

*कारण प्रत्येकाचे अश्रू घेऊन मी धावली.*

*आठवण माझ्या शाळेची रे*

*मनामध्ये उमलली,*

*चुलबुली फुलपाखरू मी*

*कुठेतरी शाळेतच हरवली.*

*- विचारधारा*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children