कन्या
कन्या
कन्या म्हणजे.....
आयुष्याला दिशा देणारी एक समंजस वाट
जीवन अधिक सुखकर बनवणारी सुखाची लाट
चेहऱ्यावरचं निरागस स्मित
हृदयात जपलेलं एक हळवं गुपित
कन्या म्हणजे
नक्षत्राच देणं...
कोणी म्हणत परीस कोणी म्हणतं सोनं
कन्या म्हणजे मायेची गुंफण, प्रेमाची शिंपण
सर्व घरातील आनंदाचं चांदणं अन् सुखाच लिंपण
कन्या म्हणजे...
आई नंतर प्रेमाचा अमर्याद असा झरा
आजी-आजोबांचा विरंगुळा
अन् करूणेचा पुतळा खरा
कन्या म्हणजे
स्वतःच्या प्राणाहून प्रिय अशी परी
आपल्या वडिलांची
सदैव सावली भासते ती मायेची
शोभा उठून दिसते तिच्यामुळे घरादाराची
स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी
वात असते ती इवल्याशा पणतीची
कन्या म्हणजे..
साजरे दिसते तेव्हा अंगण
वाचते जेव्हा जिचे पैंजण
खळखळून हसते जिच्यामुळे घरातील तुळशी वृंदावन
