भारतमातेचे मुले
भारतमातेचे मुले
1 min
309
आम्ही मुले भारतमातेचे
असू लाडके सर्वांचे
ज्ञान वेलीचे लावूनी
जीवन बनवू सुखाचे
विज्ञानाचा प्रसार करूनी
पाउल ठेवू प्रगतीचे
एक झाड लावूनी
धोके सांगू प्रदुषणाचे
रोग सारे पळवूनी
धडे शिकू स्वच्छतेचे
पाऊल पडती पुढे पुढे
मुळीच नाही घाबरायचे
सक्षम नागरिक होउनी
विकास करू या सर्वांचे
