गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
टप्टप् टप्टप् पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या.
पकडुनि धरता वितळुनि गेल्या,
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या.
गड्गड् गड्गड् मेघ गरजती,
चमचम चमचम विजा चमकती.
थुईथुई थुईथुई मोर नाचती,
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या.
थडथड थडथड थंडी वाजते,
हाक आईची ऐकू येते.
