पावसा पावसा
पावसा पावसा
पावसा पावसा सरसर ये
पावसा पावसा भरभर ये
सरीमध्ये नाचू दे -
ओलं चिंब होऊ दे
होडी मला बनवू दे -
होडी होडी खेळू दे
होडी माझी शिडाची
सुरु सुरु चालायची
होडी माझी बंबाची
दूर देशा निघायची.
चला सारे गावाला
या रे सारे फिरायला
दूर दूर भटकायला
पावसामध्ये नाचायला.
