गाय
गाय
1 min
393
गाय आहे
पाळीव प्राणी
वेळेवर द्या
भोजन पाणी
खाई ती
गवत चारा
नाही चढत
तिचा पारा
रंग तिचे
भिन्न भिन्न
दूध आहे
संपूर्ण अन्न
रोगांना दूर
ठेवी गोमूत्र
शेणखत झाड
वाढण्याचे सूत्र
अंगणात घुमतो
आवाज हंबरण्याचा
पाडसाला भरवताना
भाव प्रसन्नतेचा
गळ्यातील घंटेचा
होता नाद
वाटे जणू
घालते साद
रूप तिचे
गोजिरवाणे लोभस
भाव किती
ते निरागस
दुधाने बनते
शरीर बळकट
गायीचे दूध
प्या घटघट
निरोगी जीवनाचा
गाय आधारस्तंभ
गोमातेला जपण्याचा
करू आरंभ
दुधाच्या अभिषेकाने
पूजेला अर्थ
मिठाईतील आहे
मुख्य पदार्थ
