संसार
संसार
1 min
354
दोन हाताचे चार हात झाले
संसाराचे तोरण गळ्यात बांधले
सुंदर स्वप्न उराशी बाळगून
एकदाचे जीव भांड्यात पडले
अधीमधी भांड्याला भांडा आदळतो
मात्र भांडाफोड कधी होत नाही
गुण्यागोविंदाने राहून गाडा पुढे ढकलतो
आदळ आपट करत पुढे पुढे हाकलतो
संसार म्हणजे नव्हे ,बाहुला बाहुलीचा खेळ
नाक तोंड मुरडत करावे लागते ताळमेळ
वेळात वेळ काढून द्यावे लागते वेळ
वेळ नाही दिला म्हणून आगीत नको तेल
संसारात हात झाडून मोकळे होता येत नाही
हाताला हात दिल्याशिवाय गाडा पुढे चालत नाही
उष्ट्या हाताने देखील कावळा हाकायचा असतो
हातवारे करून काव काव करायचा नसतो
अत्तराचे दिवे लावून संसार कधी उजळत नाही
घरोघरी मातीच्या चुली आता कुठे दिसत नाही
दोन हाताचे चार हात झाल्याशिवाय संसार कळत नाही
संसाराला फोडासारखे जपल्याशिवाय गोड भाकर मिळत नाही
