STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Children Stories

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Children Stories

एक गुलाब

एक गुलाब

1 min
342

पाहिलं एका गुलाबाचं

आज गुलाब विकणं

फुलेल मी उद्या पुन्हा

या आशेवर झुलणं


उन्हाच्या तप्त झळांतही

त्याचं न कोमेजणं

निराशेच्या काळोखातही

त्याचं ते उजळणं


हलाखीच्या काट्यातही

त्याचं हसून फुलणं

ऊन, वारा,पाणी, पाऊस

 सहज हसून झेलणं


मरगळलेल्या माझ्या मनाला

नव्याने शिकवलं जगणं

तरतरी देऊन गेलं

त्याचं निरंतर धडपडणं


खेळण्याच्या वयात गुलाबा

तुझं स्वाभिमानाने जगणं

देऊन गेलं सर्वांना

नव्या आत्मविश्वासाचं देणं


Rate this content
Log in