STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy Others

4  

Rajesh Sabale

Tragedy Others

आठवण

आठवण

1 min
293

का पुन्हा आठवण यावी।

दिल्या घेतल्या शपथांची,

अन पूर्तता नाही झाली,

प्रेमात मारल्या थाप्पांची,


पाण्यात सोडून पाय,

बसलो नदीच्या काठी।

मागून आली सखी,

मारली की ओ मिठी।।


हातात होता गजरा,

केसात माळला नाय।

मिठीत तिच्या विसरून गेलो,

भानच राहील नाय।।


मधाळ तीच बोलणं,

मन लई खुलवायच।

एकांत नदीकाठी

ऐकत नुसतं बसायचं।।


नदीचा किनारा, थंडगार वारा।

यान पोट कसं भरायचं।

पोटासाठी प्रेम मात्र,

अर्ध्यावरच सोडायचं।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy