आठवण
आठवण
क्षण हे अनुभवते मी वेदनेचे
जाळी उराला तुझी प्रतारणा
मार्गच वेगळा तुझा नि माझा
तरीही आठवण छळते पुन्हा
आठवणी बिलगतात राञीला
छळतात स्वप्न होवुनी निद्रेला
मिटताच डोळे विसावतोस माझ्यात
सुख चैन आठवण घेवुनी गेला
तरी कसे समजावु वेड्या मनाला
शिरते पुन्हा मन तुझ्याच अंतरात
सैरभैर मन माझं राहिलं न् ताब्यात
तुच रुतलास माझ्या काळजात
प्रेम पुन्हा न कधी व्हावे
एकलेच जगावे मी माझ्यात
मरणयातना जिवंतपणी अनंत
उडी घेतली खोल प्रेमडोहात
समजावे तरी न समजे मनाला
लगाम बंध कसलाच मला
धाव घेई तुझ्याकडे सुसाट
भिती न उरली मला हा जीव वेडावला
