आठवण
आठवण
किती तरी दिवसात
नाही गेलो मी शाळेत
सतत राहिलो खेळत
तरी पास झालो परीक्षेत
किती तरी दिवसात
नाही मित्र भेटले मज
शाळा,शिकवणी बंद
मन झाले निराश आज
किती तरी दिवसात
नाही केला मी अभ्यास
नाही स्पर्धा,नाही खेळ
मन झाले उदास उदास
किती तरी दिवसात
नाही आले कुणी पाहुणे
सण नाही उत्सव नाही
सतत खातो मी बोलणे
किती तरी दिवसात
नाही गेलो फिरायला
नाही हौस,नाही प्रवास
नाही गेलो पोहायला
किती तरी दिवसात
नाही खाल्ली मी छडी
किती तरी दिवसात
मित्रांची नाही काढली खोडी
