आठवण
आठवण
तुझ्या आठवणींन्
आभाळ काळभोर झालाय
श्वासातले शब्द श्वासातच अडकलेत
पापण्यांच्या काठावर तळे साचू लागलेत
प्रकाशालाही अंधाराचे स्वप्नं पडू लागलेत
अंधारात चमकणारे काजवेही विस्कटून गेलीत ....
एवढं सगळं झालं तरीही तू मात्र
माळरानावरच्या एका जीर्ण शीर्ण झालेल्या
झाडाचा आश्रय घेतलास
आणि मी...
माझ्या आठवणीतल्या यातनांना
जागा मिळेल तिथं
गाडून पुढं पुढं जातोय
त्या झाडाला मागे टाकत
