STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Inspirational

3  

Vasudeo Gumatkar

Inspirational

आठवण

आठवण

1 min
12.9K



अलगद स्पर्श होता

तरंग सारे उठतात

आठवणी तुझ्या त्या

मनात खूप दाटतात


उगाच केले दूर तुला

हृदय आज बोलते

आठवता आज तुला

धकधक ही वाढते


मैत्रीचा तो धागा

कसा तुटून पडला

घाव तो वेदनेचा

मनाला लागून गेला


आजही आठवते मला

पहिला कॉल केलेला

अनोळखी असताना

मी अडखळत बोललेला


नको राग मानू तू

मी असा दुरावा दिलेला

परीस्थितीच्या गुलामीत

मी आहे आज अडकलेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational