STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आठव स्वातंत्र्यवीरांचा

आठव स्वातंत्र्यवीरांचा

1 min
169

शिर तळहातावरी घेऊनी

लढले क्रांतीकारक त्वेषाने

स्वातंत्र्य मिळाले भारतदेशा

त्यांच्या अतुलनीय त्यागाने (१) 


जीवन अर्पिले तयांनी

झोकुनी देशस्वातंत्र्यासाठी

घरदारावरी तुलसीपत्र 

अर्पिले खुशीने देशासाठी  (२)


आठव तयांचा येतो आहे

आज भारत स्वातंत्र्यदिनी

कितीही काळ लोटला तरी

कृतज्ञ अमर बलिदानी   (३)


शूर सैनिक प्राणपणाने

रक्षण देशाचे करतात

स्वातंत्र्यदिनी कृतज्ञता 

व्यक्त नागरिक करतात   (४)


स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार

कधीच कुणी करु नये

स्वातंत्र्य स्वतःचे देशाचे

रक्षूनी इतरांनाही द्यावे   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract