आठोनिच्या झुल्यावरं
आठोनिच्या झुल्यावरं
आठोनिच्या झुल्यावरं
गेला पाउस नाचुनं
सर्दावल्या त्या मनाले
देल्ली अंगार लावून
गच्च चिखोलं भरल्या
पाय फसनीच्या वाटा
हातातल्या मेंदीसाटी
कायजाचा आटापिटा
जरा लवली पापणी
केला इशारा तो खोटा
गेला पायात खुळूनं
हिर्वा अनिदार काटा
सल काट्याची उरातं
अस्यी काई उसयली
त्याले कोरता कोरता
उभी बंदी इरयली
धाकधूक अंधाराची
दोनी अंगात भिनली
ओली खवंद काटयांची
भरपावसातं न्हाली
पांदनीच्या आळवाटा
कस्या कानोकानी गेल्या
हटखोरावानी साऱ्या
काटा काळाले लागल्या
आठोनीच्या झळीसंग
मन चिंब चिंब न्हालं
जूनं जाणतं कुरूप
आज हिर्वगारं झालं
(वर्हाडी बोलीतील ही कविता आहे)
