जगी जेजे थोर
जगी जेजे थोर
1 min
137
जगी जे जे थोर
मानावे ते गुरु
करू नये सुरु
गुणगान
शिकविते नदी
ध्येयाप्रत जाणे
सागराची होणे
समुळची
फुले शिकविती
वाटावा सुगंध
झुगारुनी बंध
रंकराव
पुस्तकाचे धन
ज्ञानाचे साधन
शिकावे आपण
वाचुनिया
अनुभव असे
जीवनाचा गुरु
आयुष्याचे तारू
सांभाळण्या
