STORYMIRROR

RAVINDRA DALVI

Others

4  

RAVINDRA DALVI

Others

जाण ठेवुनी वागावे...

जाण ठेवुनी वागावे...

1 min
130

जाण ठेवुनी वागावे

भान जपावे वयाचे

आपणही होवू उद्या

त्यांच्या वयाचे...


अनुभवाचा खजिना

सांभाळावा गाठी

तारुण्याच्या पाठी

येते हातामध्ये काठी..


द्यावा सन्मान त्यांना 

नको उगा सहानुभूती

चार प्रेमाच्या शब्दांनी

जपावी नातीगोती...


जन्मासवे मृत्यू

सांगा कुणाचा चुकला

झाले सार्थक त्याचे

जो नेकीने वागला... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन