STORYMIRROR

RAVINDRA DALVI

Others

4  

RAVINDRA DALVI

Others

लेक---

लेक---

1 min
333

दिसे ऐन्यात साजरी

माझी गोजिरी सावली

जशी देवाने धाडली

माझ्या घरी वं माउली


रूप तिचे असे भारी

फुलावानी गं कोवळे

तिला पाहण्या गं भरे

साऱ्या ऋतूंचे सोहळे


लळा लावते जिवाला

मन तिच्यासाठी झुरे

इवलेशे हात जेव्हा

माझ्या केसातूनी फिरे


घर अंगणात करी

चांदण्याची बरसात

चिमुकल झाड जस

हले माझ्या अंतरात


काम्पुटर खेळताना

गोड समाधी लागते

चंद्र आकाशी नुसता

वाट पाहुनी थकते


जरा दिसेनाशी होई

जीव वेडावुनी जाई

आड पडद्याच्या मागे

गाणे आनंदाचे गाई


प्रश्न विचारू विचारू

किती भंडावूनि सोडे

मुखातुनि जसे माझ्या

सोडे विश्वाचेच कोडे


बाप लेकीचा म्हणुन

काळजात धस्स होते

काळ आजचा पाहुन

उर सश्यागत होते 


देतो बांधून शिदोरी

संस्काराची तुला पोरी

काही अडणार नाही

उद्या परक्याच्या घरी


उपकार तुझे देवा

कसा होऊ उतराई

दिली माझ्या घरी लेक

साता जन्माची पुण्याई 



Rate this content
Log in