STORYMIRROR

RAVINDRA DALVI

Others

3  

RAVINDRA DALVI

Others

पाउस पाहूणा…..

पाउस पाहूणा…..

1 min
147

पाउस पाहूणा

चार महीन्याचा

सण आनंदाचा

चराचरी


सुखावतो बळी

तृप्त होई रान

सृष्टीला उधाण 

समृद्धीचे


पावसाशी जुळे

असे भावबंध

काट्यालाही गंध

हीरवाचं


सर आषाढाची

ओढ लावी जीवा

भेटीसाठी देवा

पंढरीच्या


श्रावणाची झड

भक्तीत न्हाहती

श्रध्देने वाहती

बेलपान


पाउस आधार

देतो प्रेमीजीवा

काळजाचा ठेवा

गच्चओला


गिरीशिखरात

कोसळतो धुंद

वाहतेय मंद

दुधगंगा


असेच भरून

पावसानं यावे

वाहूनिया न्यावे

दु:ख सारे 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍