सोहळे रंगाचे...
सोहळे रंगाचे...
1 min
166
आयुष्याच्या रंगमंची
किती सोहळे रंगाचे
कधी निर्मळ सुखाचे
कधी गडद दु:खाचे
झोत प्रखर उन्हाचा
जीव कासावीस करी
थेंबभर पाण्यासाठी
भटकंती दारोदारी
संधी वाचुन वंचित
भाग्य नासवले जाते
प्रयोगाच्या प्रतिक्षेत
उभी हयात झुरते
कधी काळी बोलबाला
होता श्रीमंत मनाचा
क्षणाधार्त बदलूनी
होई फकीर जगाचा
जेव्हा सुख येते दारी
अंगी त्राणही उरेना
कसा करावा उत्सव
अंती काही उमजेना
