बाजार प्रश्नाचा
बाजार प्रश्नाचा
बाजार प्रश्नाचा
देशापुढे उभा
उत्तराचा गाभा
पोकळच
शिक्षणाची गंगा
अजुनही दूर
अज्ञानाचा पुर
ओसंडतो
प्रश्न आरोग्याचे
अजुनी आजारी
सोडवा सत्वरी
देशासाठी
सांगा कधी झाला
सातबारा कोरा
नापिकिचा फेरा
दरसाली
दुष्काळाची धग
नित्याचीच झाली
उरला ना वाली
सोडवाया
भ्रष्टाचार रोज
घोटतोय गळा
व्यवस्थेचा मळा
पोखरण्या
प्रदूषण इथे
जाहले विषारी
आजारांची वारी
दारोदारी