STORYMIRROR

RAVINDRA DALVI

Others

3  

RAVINDRA DALVI

Others

दुष्काळ..

दुष्काळ..

1 min
232

दूष्काळ दूष्काळ

असा कसा काळ

पेटवितो जाळ

काळजात


कोरड्या विहीरी

लपविते तोंड

आपुले दगड

करंटेच


नदिलाही मुळ

गवसेना आता

भगीरथी बाता

फसव्याच


पशु पक्षी सारे

झाले परागंदा

दुष्काळाचा धंदा

तेजीतच


करपले रान

हरवले भान

कोरडे धरण

देखवेणा


छावनीचा चारा

नशिबात आला

दुष्काळाचा घाला

सालोसाल


सामसूम झालं

अवघचं जीण

जगण्याची विण

विस्कटली 


पावसाला जोडू

आता दोन्ही हात

करायला मात

ये सत्वर


दिस दुष्काळाचे

दाखू नको देवा

हिर्वाइचा ठेवा

जपेन मी



Rate this content
Log in