आवडीचा पेन...
आवडीचा पेन...
1 min
442
“बाबूजी ले लो ना बच्ची के लीए 10 रुपये का तो है
आपके भी बहोत काम आयेगा”
फाटक्या फ्रॉंक मधील ती
निरागसपणे विकत असते पेन
सिग्नलवर...
मागे बसलेली माझी मुलगी
पेटते हट्टाला.. माझाही होतो नाईलाज
खिशातली दहाची नोट
काढून ठेवतो तिच्या हातावर
तोवर हिच्या हातात पडलेला असतो
आवडीचा पेन..
ती मात्र
केव्हाच झेपावली असते
पुढच्या लाल सिग्नलवर
हिच्या प्रश्नाने
मी होतो अनुत्तरीत
“पप्पा ती आपला पेन कां बरं विकते”
