आठ एप्रिल
आठ एप्रिल
 तेराव्या दिवसाचा सांज समय..!
चन्द्र आहे साक्षीला..!
चन्द्र आहे साक्षीला
म्हणुनी बरे झाले
नाहीतर उगाचच आणा भाका
व्यर्थ ठरल्या असत्या...
प्रेमी युगलांच्या
समज गैरसमजाने
या कलियुगी
पंचायती झाल्या असत्या...
तो काहीच
कधी बोलत नाही
आणि भेटीत
बोलूही देत नाही...
पाहून सारे
सदैव आंधळा असल्याचे
नाटक मात्र
मस्त वठवतो...
नेमक्या वेळी
पिर्णिमेचे तेज फाकून
मोठी अडचण
निर्माण करतो...
आणि कधी कधी तर
कहरच करतो
साक्ष हवी असताना नेमकी
आमावश्या आहे म्हणून दडी मारतो...
आज मात्र मुद्दाम
डोळे फाडून पाहतोय
कोण कोण घरी आहे
याची खातर जमा करतोय...
मी पाप भिरु माणूस
आपणहूनच हजेरी दिली
म्हंटले हवी तर तूच
तिची पण हजेरी घे...
उद्या पुन्हा आल्यावर
माझा निरोप काय दिलासा ते सांग
आणि ती काय म्हणाली ते मात्र
ध चा मा न करता सांग ..
तसा तो हसला
मलाही राग आला
म्हंटले लेका तुझ्या मुळेच तर
हा सर्व घोटाळा झाला...
मी इथे ती तिथे
ही रे लेका तुझीच करणी
कशाला करू रे बेट्या
आता तुझी मनधरणी...?
