आत्मा
आत्मा
शरीर आणि आत्मा
पूरक आहेत एकमेकांना
किंमत आहे शून्य
शरिराची आत्म्याविना
जीवनात येणारे प्रसंग
चांगले किंवा वाईट
सांगतो आतून आत्मा
जा सत्मार्गाने नीट
आत्मा आहे परमात्म्याचे
एक छोटेसे रुप
प्रत्येकाचे हृदय असते
ईश्वराचेच प्रतिरुप
दुष्कर्म करता शरीराला
ञासतर भोगावाच लागतो
आत्मापण तसाच आपला
अतृप्ततेने भरकटत राहतो
शरीर आहे नश्वर
सत्कर्म करत राहावे
आत्मापण तृप्त होईल
ईश्वराला स्मरत राहावे
