आता जागं व्हायलाच हवं...
आता जागं व्हायलाच हवं...
त्यादिवशी बातमी बघितली,
आणि धस्स झालं थोड्या वेळासाठी.
सगळं पाण्याखाली जाणार म्हटलं कुणीतरी
सगळीकडे पाणीच पाणी.
पण खरच
यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीय
ज्याचं जे आहे त्याचं तो मागणारच,
सात बेटांनी बनलेली मुंबई
एक आला दोघे आले
सगळ्यानाच तिने जवळ केलं
पण माणसाने शेवटी दाखवेलच त्याचे रंग
मग त्या मुक्या निसर्गाने तरी किती दिवस शांत बसाव
तोही त्याचे रंग दाखवणारच.
पण तरी
तरी अजून फक्त तो समजावतोच आहे
आणि समज द्यायची नाही वेळही आता लांब नाही
पाण्यावरून तिसरं महायुद्ध होण्याची भीती मावळली आता
कदाचित पाण्यातच बुडून जीव जाण्याची भीती वाटतेय
पण अजूनही कुणी समजताना दिसत नाहीये,
अजूनही तेवढेच फटाके फुटतायत
तेवढेच मजले उभे राहतायत
आतातरी जागं व्हायलाच हवं
कारण आता खऱ्या अर्थाने पाणी नाकातोंडाशी आलय
