आसूड...!
आसूड...!
आसूड शब्द
कालबाह्य झाला
पण
आसुडाने ओढलेला
व्रण मात्र
अजून तसाच आहे
अगदी अगदी
काळ्या दगडावरच्या रेषे सारखा
कधी कधी
तो प्रकर्षाने जाणवतो
कधी कधी सलतो
पण
एक गोष्ट नक्की
तोच व्रण
आठवण ताजी ठेवतो
आणि
जीवन जगण्याची
नवी उर्मी देतो
पाऊल पुढे पडते
प्रगती होते
चांगले घडते
बरे वाटते....!
