STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

आशा...

आशा...

1 min
530



पहा फाकलं आभाळ

होता सुरेख सकाळ

सरला दुःखाचा काळ

येता जीवनी सुकाळ..


झटकता आळस

दिसेल यशाचा कळस

नको वाटाया किळस

दारी असता तुळस...


तेजोमय भास्कर

येतो जीवनी सत्वर

असली जरी आवस

नित्य येतो नवा दिवस...


दुःख जाते रे क्षणात

तेज संचारता तनात

आनंद नांदतो मनात

नसे न्यून काही जीवनात...


नको कोणतीच फुका भ्रमंती

सुखाची नित्य जयंती

मिळते प्रत्येकास रे अंती

सौख्य समाधान शांती....


पहा डोळे उघडून जरा

तो भास्कर आला रे खरा

मारण्या सुखाचा फवारा

जीवनात तुझ्या रे सारा...


आनंदात उठ आता

फाकले नभ आभाळ

झाली सुंदर सकाळ

सरला दुःखाचा रे काळ.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational