STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

3  

Smita Doshi

Inspirational

आशा किरण

आशा किरण

1 min
378

रात्र,निशा,यामिनी,रजनी

कधीमधी येतात प्रत्येकाच्या जीवनी

पण रजनीपाठोपाठ आहे उगवती

जी दाखवेल यशाची वाट सभोवती


दुःखाने खचून हतबल होऊ नका

सूर्याच्या किरणाकडे आशेने पहा

यशाच्या मार्गात काटे असणारच

पण त्यांनतर अंतिम साध्य साधणारच


दृढ विश्वास मनी बाळगा

ध्येयाकडे निश्चयाने सामोरे जा

फलश्रुती आहेच समोर साक्षात

हां पण स्वतःलाच घ्या स्वतःच्या विश्वासात-


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational