आर्त विराणी
आर्त विराणी


अशी कशी रे सखया
रीत प्रीतीची आगळी
प्रीत मनीची सांगाया
संधी ना कधी लाभली
गूज नजरभेटीचे
अंतरात झेपावले
भाव मम हृदयीचे
हृदयाला समजले
ओठाआड दडे प्रीत
लाज बावरी मनात
स्त्रीसुलभ लज्जा मनी
शब्द आडती ओठांत
मुग्ध प्रीती मन्मनीची
अबोलच का राहिली
आर्त मनाची विराणी
सख्या तू न जाणली