STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

2  

गोविंद ठोंबरे

Inspirational

आपुलेच सारे..

आपुलेच सारे..

1 min
14.5K


आता माझा म्हणून नाही भारता तुझा म्हणून शिक

माझा माझा करत पदरी पडतेय दारिद्रयाची भीक

भारत फक्त माझा नाही तुझा पण देश आहे

माझ्या नावाचं बिलाईत आता बांधावर फेकणे आहे


माझा म्हणून भांडत तंटत वाटले आम्ही महापुरुष

माझाच म्हणून स्वतःवर केले विषमतेचे छळ अमानुष

संतापुढेही जात लावून केलं माझ्याच जातीचं माणूस

माझाच तो रंग म्हणून लाल रक्ताने माखले कापूस


माझं ते तुझं म्हणायला लागतात निधड्या छातीचे ऊर

माझ्या नावाच्या अहंकाराचे मग निघतात कर्कश सूर

माझा म्हणून आता तुझ्या मनाचा पडतोय मला विसर

इथे न राहिले माझे काही अन माणुसकीत राहते कसर


माझा धर्म नि माझी जात माझा मुलुख अन् माझीच राख

राखेवरचा तप्त निखारा मलाच झळ अन् मी बेचिराख

नको नको तो माझेपणा अन माझेच सर्वचा घंटा नाद

माझे हे माझे कशाचे आपुलेच सारे घालूया साद



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational