STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

आपलं स्थान...!

आपलं स्थान...!

1 min
489


आपलं स्थान....!


आपलं स्थान आपणच ठरवायचं असतं

आपल्या स्थानावर आपणच स्थिर राहायचं असतं

आपल्या स्थानाच आपणच मोल सांगायचं असतं

आपलं स्थान आपणच अमूल्य सिद्ध करायचं असतं


स्वाभिमान आपला जपायचं असतं

स्वाभिमानांन जीवन जगायचं असत

स्वाभिमानच मोल अमूल्य असतं

मौल्यवान स्वाभिमान जागृत ठेवायच असतं


त्रिभुवनीं स्वाभिमानालाच किंमत असते

स्वाभिमानात मोठी हिम्मत असते

स्वाभिमानाने जग जिंकता येते

स्वाभिमानातच खरे यश असते


यश हे आपल्यातील स्वाभिमानात असते

स्वाभिमानाच्या आत्मविश्वासात असते

आत्मविश्वासाच्या आत्म प्रेरणेत असते

प्रेरणेच्या दृढ आत्मविश्वासात असते


म्हणून संकल्प असा करावा

की त्यात कोणताही विकल्प नसावा

तडीस जाण्यास श्रद्धा अशी असावी

की त्या श्रध्येस कोणताही पर्याय नसावा


अशा संकल्पाची पुर्ती क्षणात होते

अशा श्रद्धेचे फळ त्वरित मिळते

अशा आत्मविश्वासाचे कौतुक होते

अशा स्वाभिमानाचे यश उज्वल उन्नत असते....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational