आनंदप्रवासी
आनंदप्रवासी
हरवलाच होता कि गर्तेत दुखाच्या
नाही थांग ना कधी किनारा शोधला
पर्यास निखळ जगण्याच्या शर्यतीचा
जगणे जणू एक सोपस्कार कशाला?
मनसागराच्या तळाशीच लाभेल ती
मनशक्ती, दिव्यदृष्टी आणि ती दिव्यशक्ती
आसमंत उजळावया दाही दिशांचा
एक तेजोवलय स्वतः भोवतालचा
शब्दसिद्धि साधेल प्रेरणा अंतरीची
कृतज्ञता शोधेल भावनेची उभारी
एक एक शब्द अस्रेच ती ब्रम्हांडी
कंपनाची शक्ती एक अनुभवाला
स्वयं मार्ग शोधी ,वरदान ही शक्ती
इच्छा तेथे मार्ग मिळेल आयुष्याला
घेऊन सामर्थ्य विचारांचे सोबती
परलोकीची ही भीती नाही तयाला
प्रवास असा सहज सन्मार्गी
आत्म्याची होय सर्वांगीण प्रगती
ध्यानयोगाचा हा मार्ग जोपासताना
आनंदप्रावासी तु या प्रकाशवाटेला
