आनंदी जीवन
आनंदी जीवन
नको, नको, रे माणसा, करू भांडवल गरीबीचे।
का फुका मागतोस भीक, चीज होईल मेहनतीचे॥
वेदना ती क्षणभर, नको देऊ तिला थारा।
गरिबी जाईल संपून, येईल आनंदी -वारा॥
जगामध्ये सर्वसुखी, कोणीही ना जन्मला।
प्रयत्नांती परमेश्वर, सुख घेऊन भेटला॥
का रे राहसी गरीब, का बाळगिशी वेदना।
लाभे देवाजीची कृपा, ठेव आनंदी जीवना॥
