आली गौरायी अंगणी..!
आली गौरायी अंगणी..!
पहा पहा नाचाचा जरा
ओसंडणारा आनंद खरा
नऊ वारी साडीचा तोरा
लाजवितो नाचऱ्या मोरा
गौराई ला साद घालण्या
सादर करिती अदा नाचण्याच्या
उत्सुक साऱ्या मुली या सुंदर
थिरकती तालावर आपल्या शाळेच्या
स्पर्धा असली जरी नाचाची
तरी भिनली अंगी स्त्री शक्ती
भुरळ घालण्या गिरकी घेती
साधूनी लयीची स्वर मधुर उक्ती
मंत्रमुग्ध होउनी पाहती
प्रेक्षक सारे सुर तालात
खरेच झाला नाच मुलींचा
कौतुकास पात्र असा जोरात
अशीच उंच पताका
कौतुकस्पद फडकू दे जीवनात
आशीर्वाद मुलींनो तुम्हा मिळुदे
कर्तृत्व झळकण्या तुमचे विश्वात....!!!