STORYMIRROR

Mina Shelke

Fantasy

3  

Mina Shelke

Fantasy

आला श्रावण

आला श्रावण

1 min
13.7K


रिमझिम पावसात

आली श्रावणाची स्वारी

स्वागताला पारिजात

सडा टाकतोय व्दारी....


बांधावर लगबग

रानफुले नाचताती

वाऱ्यासंगे डोलताना

वेलीवर काचताती...


आनंदली वनराई

जशी नटे वरमाई

केवड्याचा दरवळ

सुगंधित झाली आई


इंद्रधनू सप्तरंग

उधळून हसतोय

धरतीच्या नवतीला

नभातून बघतोय


सोनसळी किरणांचा

थवा येई अवचित

सर नाजुक कोमल

क्षणभर विचलित...


चराचर हे अवघे

रोमरोमी तरारले

श्रावणाची आगमन

गात्र गात्र सुखावले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy