STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Others

1  

Abasaheb Mhaske

Tragedy Others

आला आला रे पाऊस

आला आला रे पाऊस

1 min
404

आला आला रे पाऊस 

काहींची फिटली हौस

कुणी म्हणते नको रे जाऊस 

असा कसा रे कोपला ?


आला आला रे पाऊस 

जगणे सारे हिरावले 

घास तोंडीचा रे पळवतोस 

सूड कधीचा रे घेतोस  


आला आला रे पाऊस 

कसा बेफाम नाचला छाताडावर 

आला तरी ही बरबादी 

ना येत तर ठरलेलीच 


आला आला रे पाऊस 

हवा हवासा कधी नकोसा 

देतोस तसा हिसकवूंनी घेतो 

पुढा-या परी कसा दुतोंडी झालास  


आला आला रे पाऊस 

येतोस पण फसवून जातो 

पुढा-या गत बरसून जातो 

असून अडचण नसून खोळंबा 


आला आला रे पाऊस 

पिके बहरली पण 

नद्या कोरड्याच कशा ?

अक्ख्या जिंदगानीच हशा 


आला आला रे पाऊस 

घेऊन बरबादीच गाणं  

आला तसा गेलास खुशाल 

पुढा-यागत बेगडी झालास


आला आला रे पाऊस 

डोळ्यात कसा विसावला 

फसवण्यास तुला कसा 

गोरगरीब सामान्यच दिसला 


आला आला रे पाऊस 

केवढा थयथयाट केला 

गुरं ढोरं , पोरं सोर देशोधडी 

होत्याचं नव्हतं क्षणार्धात 


आला आला रे पाऊस 

फिटली का रे तुझी हौस ?

तू हि निघालास संधीसाधू 

पुढा-या गत झालास भोंदू 


आला आला रे पाऊस 

जाईल वेळ राजा नको हबकुस 

मिळुनी सारे लढू आता ....

माणुसकीचा झेंडा उभारू चला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy