STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Children

2  

Dattatraygir Gosavi

Children

आजोळ

आजोळ

1 min
105

स्मृती आजोळी आजोळी

पळ पळ जाग्या झाल्या 

किती उजळा उजळा

पळ पळ मागे आल्या।।धृ।।


निघे पदर पदर 

एक एक सवसांगी

ह्रदयी स्मृतीचे कळप

भरी नवल कणगी।।१।।


नवलाची नवलाई

भाचा उबंराच फुलं

कुठ ठेऊ कुठ नाही

मामा मामी मनी झुलं।।२।।


माह्या आजीची न्यारीचं

पदराची मखलाषी

आणी काही बाही खाया

नातू खुश अभिलाषी।।३।।


मामे भाऊ सह जाऊ

रानी वनी झाड माड

मोह आंबा चिंच खाऊ

पारंबी झोपाळा वड।।४।।


आजोळीची नानाविध

पक्कवाने भरपेट

रोडगी वरणं तुप 

शेवळ्या बटुळा भातं ।।५।।


माह्या मामाच्या वावरी

गर्द दाट आमराई

नारळ्या गोटी शेंदरी

अविट गोडी मलाई।।६।।


ज्याचं आजोळ समृद्ध

त्याला काही नाही उणं

ते अनुभव संपन्न

असे साधं सुध जीणं।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children