STORYMIRROR

Ramesh Sawant

Inspirational

2  

Ramesh Sawant

Inspirational

आझादी

आझादी

1 min
14.4K


आझादी,अरे भाऊ हे कोणत्या पाखराचं नाव आहे?

जे उडू पाहतंय डोळ्यांतून निसटत जाणाऱ्या

पण भयमुक्त होऊ पाहणाऱ्या आभाळात 

आता तूच पाहतोयस की

जिथं पारवादेखील फडफडू शकत नाही

तिथं मात्र घुमतोय गोळ्यांच्या वर्षावाचा आवाज

आणि तिथल्या मातीत मिसळलेलं रक्त

अजूनही गरम असल्यासारखं दिसतंय

त्यांची तर जगण्याची आशाच मेलीय

जी इथल्या जमिनीत कैद झाली होती

त्यांच्या कधीकाळच्या उमलत्या, फुलत्या जीवनासाठी

ती इथल्या प्रत्येक गल्लीत नी रस्त्यात

तडफडत असलेल्या मृत्युची नजर चुकवून जात आहे

जिथं रडत, खुरडत का होईना

पण जगू पाहत आहे आझादी...

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational