आजची लोकशाही
आजची लोकशाही
लोकशाही मध्ये आम्ही
करून नेत्याला मतदान
आम्ही चालवतो देश हा
जरी असलो थोडे लहान
तो असतो आमचा नेता
सुख दुःख जाणून घेणारा
येता आमच्यावर संकट
आम्हाला मदत देणारा
तो नाही जात खुर्चीवर
आमच्यावर सत्ता करण्या
तो जातो राजकारणात
कर्तव्याची जाणिव धरण्या
पण का कुणास ठाऊक
अचानक काय जादू होते
मिळता सत्ता त्याला
आश्वासनावर पाणी फिरून देते
सारे कर्तव्य विसरून तो
आपले खिशे भरू लागतो
ज्यांनी दिले निवडून
त्यांना समोर मरताना पाहतो
कुणी भाकरीसाठी रडते
तर पैश्यासाठी जीव घेते
पण यांना तर काळजी सत्तेची
गरिबाकडे कोण लक्ष देते
किती ही केली सत्ता
तरी एक दिवस सारे मिटणार
यांनी धरली कितीही खुर्ची
ती खुर्ची च आता तुटणार
