आजचा विषय- शौर्य/साहस
आजचा विषय- शौर्य/साहस
रणचंडिका ती झाशीवाली
पेटून उठली स्वातंत्र्यासाठी
इंग्रजांशी देऊन साहसी लढा
ज्योत निमाली शीलरक्षणासाठी
मूठभर शिवाजीच्या मावळ्यांनी
शौर्याची दाखवली परिसीमा
मुघलांना केले सळो की पळो
बेहाल केला औरंगजेबाचा मामा
शौर्य दाखविले स्वातंत्र्यसैनिकांनी
इंग्रजांशी दिला स्वातंत्र्याचा लढा
दिली प्राणांची आहूती ही हासतच
हाकलण्या देशाबाहेर उचलला विडा
बलिदान क्रांतिकारकांचे इथल्या
देशभक्ती कधीच गेली नाही वाया
फासांवर चढले सोडून घरदारही
नमविली नाही इंग्रजांपुढे ही काया
