Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

आजान नि चालीसा

आजान नि चालीसा

1 min
163


अजान नि चालीसात

गुंतु नको भावा तुला

शिवरायाची आन आहे

अज्ञानात जाशील चेतावणिला

भुलशील दंगे जाळपोळ करून

आपलयाच बांधवांना

मारशील तू

समजतोस धर्म रक्षणाच मोलाच काम

ते स्वार्थी विध्वंसाच षडयंत्र आहे

गुंतु नको भावा तुला शाहुंची आन आहे


असशील समर्थक तु धर्माचा

दंगयात जीव जातो मानसाचा

ऊजाड होतात माय भगिनी

नि उघडयावर लेकरबाळ

वकतवय करणारयांच

आलबेल सार आहे

कुटनिती ने आपला

डाव साधायचा आहे

नाटकीपणाचे हे सारे ढोंग आहे

भुलू नकोस भावा

तुला ज्योतीबाची आन आहे


 तु रस्त्यावर ऊतरशील

आवेशात नारे देशील

अवैद्य कृती केली

म्हणून तुरुंगात जाशील कोठडीतलया

अंधारात तळमळत रहाशील

विचार कर तुझ्या आईची

अवस्था काय होईल पाखंडी वृत्ती 

का तुला सोडवायला येणार आहे?

गुंतु नकोस भावा

तुला भीमाची आन आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract