STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Others

3  

Sharad Kawathekar

Abstract Others

आईच्या छायेत

आईच्या छायेत

1 min
325

तिचा प्रवास

हळूहळू दक्षिण दिशेनं 

सुरूच होत होता 

तिच्या शरीरातून रज-तमांच्या लहरी

मोठमोठ्यांन वाहत होत्या 

त्या लहरीचा परिणाम 

आजूबाजूच्या बरोबरच माझ्यावर होत होता

पण त्याचा आमच्या दोघांत एक 

चुंबकीय क्षेत्र तयार होत होतं 

तिचे प्राण पंचप्राणात विलीन होत होते 

माझ्यासमोर फक्त अंधारी बोगदा 

त्या बोगद्यातलं काहीच दिसत नव्हतं 

आजूबाजूला हळूहळू कुजबूज वाढत होती 

छाया सावली असे गुळगुळीत शब्द माझ्यालेखी संपले होते 

संस्कार करणारा बाप अगोदरच 

या अंधाऱ्या बोगद्यात केव्हाच गायब झाला होता न्

आज राहिलेलं ते छत्रही नाहीसे झालं हो

संस्कार करणारी आईपण त्या 

बोगद्यात जात होती 

अर्धवट असलेली छाया

आज पुर्णपणे नाहीशी होणार 

छत्र उजाडलं

छाया हरवली

सावली नाहीशी झाली 

छात्राचं महत्त्व समजलं

बाहेरची आणि आतली रखरख

आणखीनच प्रखर झाली 

आणि आता ती रखरख आणखीनच वाढत राहणार 

दिवसेंदिवस ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract