#आई#
#आई#
आई असते आत्मारुपी ईश्वर...
मायेचा अथांग सागर...
आई असते आद्यगुरु...
'गुरुमाऊली'ती विश्वाची जगद्गुरु..
आई असते एक ज्ञानाची खाण..
कोळशाच्या खाणीतून ही ठेवते 'हिऱ्याची' जाण..
आई देते आपल्या व्यक्तीत्वास आकार...
आई मुळेच होतात स्वप्न साकार...
प्रसंगी कठोर अथवा मृदु आई..
कधी 'सखी' कधी 'शिस्तबद्ध' आई..
कधी मायेची झालर...
कधी शिस्तीचा मार...
कधी नुसतेच 'सूचना फलक'..
कधी कणखर 'पालक'...
'सौंदर्याची खाण 'आई..
गुणांनी रुपास आकार देई...
आई म्हणजे 'सुगरणीचा ठेवा'...
'सुगरण' आई म्हणजे अन्नपुर्णेचा 'गोड मेवा'..
'हुशार' आई म्हणजे बुद्धिमत्तेची देणगी..
'कलानिपुण' आई असते अष्टपैलू व्यक्ती..
'काबाडकष्ट' करणारी आई असते विश्वाची आधार...
अपत्य आणि गृहासाठी सदैव घेत असते माघार..
गृहर्कतव्यदक्ष आई असते समाजाचा भक्कम पाया..
जिच्यासाठी सदैव विटेवरी ऊभा असतो विठुराया..
'ज्ञानेश्वर माऊली' म्हणत शिकवते जी अध्यात्मिक ज्ञान..
वैज्ञानिकांच्या गोष्टींतून ती घडविते देशाचे स्तंभ महान..
आई असते विश्वाचे
विद्यापीठ...
आपल्या आयुष्यातील पहिले व्यासपीठ..
आई आहे म्हणूनच आहे प्रत्येक श्वासात 'जीवन'...
कन्या,जीवनसंगिनी,स्नुषा, वहिनी,ननंद,सासू,.
आई,आत्या,आजी,पणजी,मावशी,मामी,ताई,सखी...
सर्वच भूमिकेत निरपेक्ष प्रेम देते ती असते आई..
अपत्यांच्या अस्तित्वात विसरते ती तिचे व्यक्तीत्व...
स्वतःचे आयुष्य देत घडविते अपत्यांचे उज्वल भविष्य..
आईच आहे आदि आणि अंत..
अशा सर्व प्रेमळ ,अष्टपैलू चारित्र्यवान आईस लाभावे दीर्घायुष्य..
जिच्या प्रत्येक सुखासाठी देव ही धावत येईल घरोघरी..
होऊनी कधी वासुदेव देवकी,नंदयशोदा गृही 'राधाकृष्ण'..
कधी दशरथकौशल्यानंदन एकवचनी 'प्रभू श्रीसीताराम'..
तर कधी जन्मेल पुन्हा अनुसयेपोटी 'दत्तगुरु' म्हणूनी..
कधी श्री.गौरीशंकर पुत्र म्हणूनी 'कार्तिकेय' व 'श्री.गणेश'..
प्रत्येक अवतारात आतूर असतो 'हरि' 'आईच्या' भेटीला...
'अंजनेय',असो की गंगापुत्र श्री.भिष्म 'पितामह'..
अथवा असो चिरंजीवी'श्री.परशुराम'..
सर्वच मातृभक्त महान..
आनंदी, आरोग्यदायी जीवन लाभावे प्रत्येक आईस...
सर्व मातृशक्तींना माझे शतशः वंदन