STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

आई...!

आई...!

1 min
14.6K



आई तुझ्या वात्सल्याचे

ऋण मी जाणतोय

तेच फेडण्याचा

मी थोडा प्रयत्न करतोय


तुझ्या कुशीत

वाढलो मी

याची जाण

आई आहे मला


म्हणूनतर तुझ्या

रक्षणार्थ मी

सदैव सज्ज

असतो आज सांगतो तुला


तुझ्या हृदयीचा

पाझर आई

जळी काष्टी पाषाणी

सदैव साथ देतो मला


सीमेवर रक्षण

करता करता

आजही तुझे आई

वात्सल्य लाभते मला


अमृत तुझ्या उदरीचे

मी मनोभावे प्राशतो

तृप्त होउनी आई

कर्तव्य माझे मी बजावतो


नतमस्तक होउनी

तुझे ऋण मी जाणतो

नित्य दर्शन घेऊनी

सज्ज राहुनी मी ते फेडतो....!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational