आई.....
आई.....
आई असतें यशाची खरी शिल्पकार
लेकराचं आयुष्य घडवते बनून दावेदार
तिच्यापुढेही संकटे येतात पुन्हा वारंवार
पण शेवटी तिच बनते जीवनाची अलंकार
चिंता दूर करून ती बनते अलगत अनुस्वार
कुटुंबाच्या काळजीत घेते नवीन अवतार
तिच्यासारखी स्त्री म्हणजे खरी दीपत्कार
कुटुंबाच आयुष्य वाचवायला ती बनते सल्लागार
तिच्यासारखी माया जणू आहे अविष्कार
तिच्या अनुभवाची छाया जणू आहे तलवार
आयुष्यात कितीही आले वेगवेगळे अनुभार
तरीही कुटुंबासाठी असतें ती खरी कलाकार
लेकरावर संकट आली कितीही अलवार
तरीही त्याला शेवटच उत्तर म्हणजे आई अलंकार
त्याच्या सुखासाठी बनते स्त्री ललकार
त्याचही आयुष्य घडवते जणू आहे चंद्रहार
आई असतें आपल्या लेकरांची खरी ललकार
संकट कितीही आले तरी ती मानत नाही हार
शब्दांच्या जोरावर लेकरासाठी करते हजारो प्रहार
म्हणून आई असतें खरी भविष्याची दिप्तकार.
