आई
आई
आई मायेचा सागर
आई जीवनाचा आधार ,
तिच्यामुळेच या जगी
तीच आहे माझा ईश्वर...
आईमुळेच घडलो आम्ही
शिकून खूप मोठे झालो ,
कष्ट केले आमच्यासाठी
तिच्या सावलीत वाढलो..
आई प्रेमस्वरूप माय
जणू रेशीम धागा अनमोल ,
बांधून ठेवले सगळ्यांना
करता येणार नाही मोल...
सर्वासाठी सदा जागरूक
काळजी तिला लेकरांची ,
पाठीवरती मायेचा हात
प्रेरणा दिली तिने लढण्याची...
तिच्या आधाराशिवाय
आम्ही अपूर्ण आहोत ,
असावी ती सदा सोबत
तिच्या इच्छा पूर्ण होवोत..
